Solapur Municipal Corporation: पालिकेच्या स्‍थगितीनंतरही होटगी रस्‍त्याचे काम सुरूच

काम थांबविण्यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला बुधवारी सायंकाळपर्यंत मिळालेच नाही
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation (Pudhari File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : होटगी रस्‍त्‍याच्‍या कामास स्‍थगिती दिल्याची माहिती महापालिका पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. मात्र, काम थांबविण्यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला बुधवारी सायंकाळपर्यंत मिळालेच नाही. त्‍यामुळे सिमेंट क्राँकीटचे काम सोडून इतर कामे सुरळीत सुरू होती.

दुसरीकडे एमएसआरडीसी व महापालिकेचे अधिकारी बुजलेले ड्रेनेज शोधण्यास व्‍यस्‍त होते. होटगी रोडवर पिण्याच्‍या पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे. येथील १५ ड्रेनेजचे चेंबर्स बुजले आहेत. त्‍यामुळे रस्‍त्‍याचे काम थांबविण्याबाबत मंगळवारी महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी काम थांबवण्याचे केवळ तोंडी निर्णय दिला.

मात्र, तसे लेखी पत्र देण्यास विसरले. त्यामुळे एमएसआरडीसीच्‍या अधिकाऱ्यांनी सिमेंट काँक्रिटचे काम थांबवून इतर कामे सुरू ठेवली आहेत.

महापालिका व एमएसआयडीसीची संयुक्‍त पाहणी

रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाची बुधवारी महापालिका आणि एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. नव्या रस्त्याखाली दडलेल्या चेंबर्सचा शोध घेऊन त्यांची स्थिती तपासण्यात आली. बुजलेल्या चेंबर्सच्या ठिकाणांची तांत्रिक पद्धतीने तपासणी करण्यात आली. संबंधित चेंबर्स पुन्हा उघडून त्यांना योग्य उंचीवर आणण्याबाबत चर्चा करण्यात आली.

रस्‍त्‍याचे काम थांबविण्याचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम सोडून इतर कामे सुरू आहेत. पाण्याची पाईपलाईनसाठी रस्‍त्‍याच्‍या बाजूला जागा सोडली आहे.
- प्रमोद जोशी, अभियंता, एमएसआरडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news