Solapur Mohol Accident |मोहोळजवळ कंटेनरला मिनी ट्रॅव्हलची धडक; कर्नाटकातील दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तिगारी येथील भाविकांवर काळाचा घाला
Solapur Mohol Road Mini Travels Container Collision
Solapur Mohol Road Mini Travels Container CollisionPudhari
Published on: 
Updated on: 

Solapur Mohol Road Mini Travels Container Collision

मोहोळ : मोहोळ-सोलापूर महामार्गावर चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या कंटेनरला मिनी ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. ३१) पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश बाळाप्पा आगसीमनी (वय ३६) आणि बिराप्पा शंकराप्पा बिसराळी (वय ४२, दोघेही रा. कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तिगारी येथील प्रकाश आगसीमनी व त्यांचे मित्र टेम्पो ट्रॅव्हलरमधून (क्र. केए १७ एबी ८४७१) शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईला भेट दिली. तेथून ३० ऑक्टोबर रोजी रात्री ते पुणे-सोलापूर महामार्गाने आपल्या गावी परतण्यासाठी निघाले होते.

Solapur Mohol Road Mini Travels Container Collision
Solapur Crop Damage : जिल्ह्यात आठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४० च्या सुमारास त्यांची मिनी ट्रॅव्हल मोहोळजवळील चंद्रमौळी एमआयडीसी परिसरात आली असता, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या कंटेनरला (क्र. केए ५६, ६०२४) पाठीमागून जोरदार धडक बसली. या धडकेत वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता प्रकाश आगसीमनी आणि बिराप्पा बिसराळी यांचा मृत्यू झाला.

या अपघातात परशराम मलप्पा बिसराळी, हनमना गौडा, अनमेष शरणप्पा हंचनाळ, गिदप्पा शंकरप्पा आगसीमनी, शिवप्पा श्रीशैलप्पा येनगी, बसवराज तळवार आणि वाहनचालक मंजुनाथ उच्चीगम्मा हे सात जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्परता दाखवत जखमींना टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Solapur Mohol Road Mini Travels Container Collision
Solapur Farmers Protest : पाच हजारांच्या दरासाठी कारखाने पाडले बंद

या प्रकरणी देवेंद्रअप्पा सोमप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक महमंद शेख खालीद (रा. बसवकल्याण, जि. बिदर) याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास अपघात विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.