Solapur Burglary | कुरुल येथे धाडसी घरफोडी; सुमारे ३.९० लाखांचा ऐवज लंपास

मोहोळ तालुक्यातील कुरुल गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना
Burglary
BurglaryPudhari
Published on
Updated on

Mohol Kurul Burglary Case

कामती : मोहोळ तालुक्यातील कुरुल गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेखर दशरथ पाटकर (वय ३५, रा. कुरुल) यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ९४/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ), ३(५) अंतर्गत तीन अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाई सुरू आहे.

Burglary
Solapur News: होटगी - मद्रे रस्त्याप्रश्नी आ. देशमुखांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून १३ एप्रिलच्या पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान पाटकर वस्ती, कुरुल येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. फिर्यादी कुटुंबासह झोपेत असताना मध्यरात्री घरात हालचाल जाणवल्याने ते जागे झाले. त्यावेळी मोबाईलच्या प्रकाशात तीन अनोळखी व्यक्ती घरात काहीतरी शोध घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फिर्यादी जागे झाल्याचे लक्षात येताच आरोपी तत्काळ घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर घरातील लोखंडी कपाट तपासले असता सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. एकूण चोरीचा ऐवज अंदाजे ३.९० लाख रुपयांचा आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news