Solapur ZP Election | मतदानाच्या पूर्वसंध्येला पैसे वाटपाचा आरोप; ‘लोकशाही वाचवा, पैसे वाटणाऱ्यांना पकडा’: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल

कुरूल गटासह इतर ठिकाणी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे प्रकार घडत असल्याचा दावा
ZP Group Cash for Votes
ZP Group Cash for Votes Pudhari
Published on
Updated on

Kurul ZP Group Cash for Votes

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दि. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, मतदानाच्या पूर्वसंध्येला पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला आहे.

आज संध्याकाळपासून कुरूल गटासह इतर ठिकाणी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे प्रकार घडत असल्याचा दावा करत, “लोकशाही वाचवा, पैसे वाटणाऱ्यांना पकडा” असे कुरूल गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार उमेश पाटील यांनी आवाहन एका व्हिडीओद्वारे केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ZP Group Cash for Votes
Solapur News: सोलापुरात भाजपविरुद्ध विरोधक महापौरपदासाठी आमने-सामने

विशेष म्हणजे, पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी थेट घोषणा उमेश पाटील यांनी या व्हिडीओतून केली आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी चिघळले आहे.

पाटील यांनी व्हिडीओत म्हटले आहे की, “मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटून मतदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीवर घाला आहे. प्रशासनाने तातडीने हालचाल करून अशा लोकांवर कठोर कारवाई करावी.”

ZP Group Cash for Votes
Solapur ZP Election: मिनी मंत्रालयासाठी 24 लाख मतदार निवडणार कारभारी

दरम्यान, आदर्श आचारसंहिता लागू असताना पैसे वाटप झाल्यास तो गंभीर गुन्हा ठरतो. या प्रकरणाची निवडणूक यंत्रणा, पोलीस प्रशासन व भरारी पथक दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहोळ तालुक्यात उद्याच्या मतदानाआधीच पैशांच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप, व्हिडीओ व्हायरल आणि बक्षिसाची घोषणा यामुळे निवडणूक रणधुमाळीला नवे वळण मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news