सोलापूर : पानीवपाटी (खुडूस) येथे माऊलीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न Pudhari Photo
सोलापूर
सोलापूर : पानीवपाटी (खुडूस) येथे माऊलींचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस (पानीव पाटी) येथे पार पडले
पानीव : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस (पानीव पाटी) येथे सकाळी ९.४५ वाजता पार पडले. दोन्ही अश्वांनी तीन फेऱ्या पूर्ण करून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
रिंगण सोहळ्यानंतर फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू आदी पारंपरिक खेळ खेळण्यात महिला व पुरुष वारकरी देहभान विसरून मग्न झाले. "माऊली... माऊली..." असा नामघोष व "ज्ञानोबा-तुकाराम" असा जयघोष यामुळे आसमंत दुमदुमला त्यानंतर पालखीने वेळापूरच्या दिशेने प्रस्थान केले.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)