

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी अतिशय चुरशीची लढत झाली. या लढतीत महायुतीच्या नऊ जागेवर, .महाविकास आघाडीतील काँग्रेसने एक तर शिवसेनाने (उबाठा) एक जागेवर विजयाची मोहर उमटवली. या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत यांनी, "महायुती जणू महाराष्ट्र जिंकल्यासारखा विजय साजरा करत आहेत" असा टोला लगावला. ते आज (दि.१३) माध्यमांशी बोलत होते. Sanjay Raut
महायुती जणू महाराष्ट्र जिंकल्यासारखा विजय साजरा करत आहेत.
गद्दारांनी गद्दारांना निवडणून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक.
आमच्याकडे कोटा नसताना उमेदवार निवडणून आणला.
जयंत पाटलांसाठी सर्वांनी प्रयत्न केले.
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत बोलत असताना म्हणाले, "महायुती जणू महाराष्ट्र जिंकल्यासारखा विजय साजरा करत आहे. गद्दारांनी गद्दारांना निवडणून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती. शिंदे गट आणि पवार गट हे दोन्ही गद्दर गट आहेत. आणि आम्हाला या निकालाने फार मोठा धक्का बसला हे खर नाही. आमच्याकडे कोटा नसताना उमेदवार निवडणून आणला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "काल (दि.१२) अपक्ष आमदारांचा भाव शेअर बाजार सारखा चढत होता. काही आमदारांना दोन एकर जमिनी दिल्याचे समजत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची मत फुटली नाहीत पण कॉंग्रसेची मत फुटली यात काही आश्चर्य नाही. त्याचबरोबर जयंत पाटलांसाठी सर्वांनी प्रयत्न केले." असेही ते म्हणाले.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत महायुतीचाच डंका वाजला. या निवडणुकीत महायुतीत भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत, शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शिवाजीराव गर्जे व राजेश विटेकर हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना (उबाठा) चे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. दुसर्या फेरीत मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली. त्यात नार्वेकर विजयी झाले.