Solapur Car Accident | अक्कलकोटहून दर्शन घेऊन सांगोल्याला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर इंचगावजवळ कार पलटली
Solapur Mangalwedha road Car crash
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर इंचगावजवळ अपघातात कार पलटी झाली(Pudhari Photo)
Published on
Updated on

Solapur Mangalwedha road Car crash

कामती : सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर इंचगावजवळ आज (दि. 22) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन सांगोला येथे परतणाऱ्या पाच भाविकांच्या कारला हा अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पावसामुळे रस्ता ओला व निसरडा झाल्याने कार घसरून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Solapur Mangalwedha road Car crash
Solapur Accident | सोलापूर - पुणे महामार्गावर बसची दुचाकीला धडक; तरुण ठार, महिला जखमी

अपघातग्रस्त कारचे चालक आदिनाथ एकनाथ मिसाळ (रा. चिनके ता. सांगोला) असून, त्यांच्यासह सर्व भाविक सुखरूप बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news