Solapur Kusti News | पैलवान जयदीप पाटील भैरवनाथ केसरीचा मानकरी

परिते (ता. माढा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा
Jaydeep Patil wrestler
Jaydeep Patil wrestlerPudhari
Published on
Updated on

Jaydeep Patil Bhairavnath Kesari 2026 winner

परिते : परिते (ता. माढा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा दोन दिवसापासून सुरू आहे. सोमवारी (दि.2) पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कुस्ती मैदान पार पडले. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस बुलेट व चांदीचे गदा पटकावून पैलवान जयदीप पाटील हा भैरवनाथ केसरीचा मानकरी ठरला. तर उपविजेता रविराज चव्हाण यास द्वितीय क्रमांकाचे स्प्लेंडर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

तृतीय क्रमांक विश्वचरण सोलंकर टाकळी याने 51 हजार रुपयाचे बक्षीस पटकावले. चतुर्थ क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षीस तात्या धुमाळे पंढरपूर यांनी पटकावले.

Jaydeep Patil wrestler
Solapur Zilla Parishad Election: मोहिते-पाटलांच्या ‘घरवापसी’नंतर पहिलीच मोठी कसोटी; सोलापूर जि.प. निवडणुकीत मविआ-भाजप थेट संघर्ष

गावातील पैलवान सौरभ मुसळे व सुनील करवते यांच्यात झालेल्या कुस्तीत सौरभ मुसळे याने सुनील करवते यास चितपट करून 25000 रुपये व चांदीची गदा असे बक्षिस पटकावले.

यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालमीतील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या मैदानी पद्धतीने घेण्यात आल्या. तर प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्रमांक यासाठी साखळी पद्धतीने कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये 72 पैलवानांनी नाव नोंदणी केली होती. एकूण सहा फेरीत खेळून चार नंबर काढण्यात आले.

Jaydeep Patil wrestler
Solapur Police Attack | पोलिसाला उचलून जमिनीवर आदळले, एपीआयच्या गळ्याला धरून ढकलले: टेंभुर्णी पोलिसांवर आरोपींचा हल्ला

या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुस्ती स्पर्धेत समालोचक म्हणून धनाजी मदने,अभिजीत लामकाने यांनी केले. यात्रा कमिटीने कुस्ती स्पर्धेचे केलेले नियोजन पाहून उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news