Solapur Zilla Parishad Election: मोहिते-पाटलांच्या ‘घरवापसी’नंतर पहिलीच मोठी कसोटी; सोलापूर जि.प. निवडणुकीत मविआ-भाजप थेट संघर्ष

स्थानिक आघाड्या, अपक्षांचा किंगमेकर रोल आणि उजनी पाण्याचा मुद्दा ठरणार निर्णायक
Solapur Zilla Parishad Election
Solapur Zilla Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

मुंबई : लोकसभेला 'महाविकास आघाडी'ने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आणि मोहिते-पाटील घराण्याच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचील प्रवेशानंतर सोलापूर जिल्हा परिषदेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या सत्तेची ही लढाई अत्यंत अटीतटीची होणार आहे.

Solapur Zilla Parishad Election
Mumbai vs Karnataka Ranji Trophy: रणजी उपांत्यपूर्व लढतीसाठी मुंबई सज्ज; शार्दूल ठाकूर, यशस्वी जैस्वाल संघात परत

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 68 गटांमधून तर पंचायत समितीसाठी 136 गणांमधून सदस्य निवडीसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून तयारी सुरु आहे. बंडखोरी रोखण्यात सर्वच पक्षांना अपयश आल्याने अनेक ठिकाणी 'अपक्ष' उमेदवार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

स्थानिक आघाड्यांचा पेच

सोलापूरमध्ये 'महायुती' विरुद्ध 'महाविकास आघाडी' अशी वरकरणी लढत दिसत असली, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.

माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) आणि खासदार प्रणिती शिंदे (काॅंग्रेस) यांच्या विजयामुळे मविआचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ग्रामीण भागात मोठी ताकद लावली आहे. भाजपसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात ताकद पणाला लावली आहे. तर शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील आणि तानाजी सावंत यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात जोर लावला आहे. सोलापूरमध्ये पक्षाच्या चिन्हापेक्षा 'स्थानिक विकास आघाड्या' महत्त्वाच्या ठरतात. पंढरपूर, माढा आणि माळशिरसमध्ये सोयीनुसार युत्या झाल्याचे चित्र आहे.

Solapur Zilla Parishad Election
State Election Commission powers: न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्य लावण्यावर वाद; राज्य निवडणूक आयोगाचा घटनात्मक अधिकारांचा दावा

राजकीय संख्याबळ

खासदार: प्रणिती शिंदे (काँग्रेस - सोलापूर), धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी-शप - माढा)

प्रमुख आमदार:

भाजप: सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख (सोलापूर शहर), सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट), समाधान आवताडे (पंढरपूर).

राष्ट्रवादी (अजित पवार गट): बबनराव शिंदे (माढा - सध्या तटस्थ भूमिकेत पण गट सक्रिय), यशवंत माने (मोहोळ).

२०१७ सालचे जि.प. संख्याबळ

२०१७ मध्ये सोलापूर झेडपीमध्ये त्रिशंकू परिस्थिती होती, मात्र राष्ट्रवादीने वर्चस्व राखले होते:

राष्ट्रवादी काँग्रेस: ३४ जागा

भाजप: १५ जागा

शिवसेना: ०५ जागा

काँग्रेस: ०६ जागा

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप): ०१ जागा

इतर/आघाड्या/अपक्ष: १६ जागा (निर्णायक भूमिका)

Solapur Zilla Parishad Election
Sunetra Pawar Politics: सुनेत्रा पवारांचा राज्यव्यापी दौरा तूर्तास नाहीच; राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

मुख्य कळीचे मुद्दे

१. उजनीचे पाणी: सोलापूरकरांसाठी उजनी धरणाचे पाणी आणि त्यावरून होणारे राजकारण हा सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे.

२. मोहिते-पाटील फॅक्टर: विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शरद पवारांशी पुन्हा जुळवून घेतल्याने माळशिरस आणि माढ्यातील समीकरणे बदलली आहेत.

३. मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला ग्रामीण भागात बसण्याची शक्यता आहे.

४. साखर कारखानदारी: ऊस बिल आणि कारखान्यांचे राजकारण निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे स्थानिक आघाड्या आणि अपक्ष कोणाच्या बाजूने झुकतात, यावरच ७ फेब्रुवारीला ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news