Solapur borewell tragedy | जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, रात्रभर बचावकार्य पण अपयश

solapur borewell tragedy- रात्रभर बचावकार्य; सकाळी बालिकेला बाहेर काढण्यात यश, मात्र मृत्यू झाल्याने हळहळ
Solapur borewell tragedy
Solapur borewell tragedy Pudhari photo
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्मती राहुल गावित (वय १.५ वर्षे, रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे.

दि. २२ नोव्हेंबर २ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जळोली येथील साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती. अंदाजे ४५ ते ५० फूट खोलवर बालिका अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथकांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.

Solapur borewell tragedy
Solapur News : अखेर ऊस दराची कोंडी फुटली

दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Solapur borewell tragedy
Solapur Fraud Case : पेन्शन, फंडाचे आमिष दाखवून २५ लाखांची केली फसवणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.