Solapur crime husband kills wife | अनैतिक संबंध संशयावरून पतीने पत्नीचा स्कार्फने आवळला गळा

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील घटना
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मोहोळ : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. त्याच कारणावरून पतीने पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून ला. ही घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे दि. २१ रोजी सांयकाळी ६:३० वाजण्यापूर्वी घडली. याप्रकरणी पती मारुती संभाजी शेळके विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ रोजी सायंकाळी ६:३० वा. सुमारास मारुती संभाजी शेळके (रा. आष्टी) याने पोलीस पाटील खासेराव भिमराव पाटील यांना फोन केला. त्याने पत्नी सुरेखा मारुती शेळके हिचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे सांगितले व याबाबत पोलिसांना कळविण्यास सांगितले. त्यानंतर तत्काळ खासेराव पाटील हे घटनास्थळी गेले असता मारुती शेळके व त्याचा मेहुणा उमेश बबन शेवाळे हे राहत्या घराजवळ, आंब्याच्या झाडाजवळ थांबलेले दिसले.

Crime News
Maharashtra Flight Routes: आता पुण्याहून अमरावतीलाही जा उडत... ‘उडान’मध्ये सोलापूर-मुंबई आणि अमरावती- पुणे हवाई मार्गांची निवड

तेथे सुरेखा ही आंब्याच्या झाडाखाली मृतावस्थेत पडलेली आढळली. मारुती शेळके याने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले. त्याच कारणावरून स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे पोलीस पाटील खासेराव पाटील यांना सांगितले. त्यानंतर पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून मारुती संभाजी शेळके याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके करत आहेत.

Crime News
Solapur Water Scarcity | सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद; 139 गावे आणि 752 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news