Solapur Death Threat: तीन लाखांच्या वर्गणीसाठी हॉटेल मालकाला ठार मारण्याची धमकी

गणेशोत्‍सव मंडळाच्‍या सदस्यावर गुन्‍हा दाखल
Solapur Death Threat: तीन लाखांच्या वर्गणीसाठी हॉटेल मालकाला ठार मारण्याची धमकी
Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : गणेशोत्सवासाठी हॉटेल व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची वर्गणी मागून, ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल व्यावसायिक एकनाथ सोपान घाडगे (वय ६७, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हॉटेल आहे. १४ सप्टेंबर निराळे वस्तीतील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे हा घाडगे यांच्या हॉटेलवर गेला. मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी ५०० ड्रेस शिवण्याच्या बहाण्याने त्याने ६०० रुपये प्रतिपोशाख याप्रमाणे एकूण तीन लाख रुपयांच्या वर्गणीची मागणी केली.

घाडगे यांनी आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगत नेहमीप्रमाणे २५ हजार वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. तसेच, यापूर्वी मंडळाला वेळोवेळी दोन लाख रुपये दिल्याची आठवण करून दिली. मात्र, संतप्त नेताजीने घाडगेंच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तीन लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. यामुळे मानसिक धक्का बसल्याने घाडगे चक्कर येऊन पडले. हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून आरोपी नेताजी शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news