सोलापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरूद्ध तपासणी मोहिम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान अवैध्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरवर बुधवारी (दि २८) कारवाई करण्यात आली. राहुल नरसिंगराव रापर्ती असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. यासाठी आरोग्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या वतीने बुधवारी रात्री ८.३१ वाजता रविवार पेठातील संजीवनी क्लिनीकची तपासणी करण्यात आली. राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे प्राप्त वैद्यकिय प्रमाणपत्र नसल्याने त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली.
वैद्यकिय उपचार घेताना संबंधित डॉक्टर बाबत शहानिशा करून औषध उपचार घ्यावते. त्याचप्रमाणे ज्यांना बोगस डॉक्टर वैद्यकिय प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात संबंधितांचे नाव, ठिकाण बाबतची माहिती कळविण्यात यावी. आसे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.