सोलापूर : शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज पालखीचे रविवारी सोलापुरात आगमन झाल्यापासून शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. सोमवारी दि. 30 जून रोजी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
रविवारी श्रींची विसावा कुचन प्रशालेत होता. सोमवारी सकाळी पालखी सातरस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात दाखल झाले. गुरुवारी दिवसभर सात रस्ता येथे श्रींच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. शेगांव येथे जाऊन दर्शन करणे शक्य न झालेल्या भाविकांनी सहकुटूंब दर्शन घेत कृतकृत झाले. मुखी हरी नामाचा आणि गण गणात बोतेचा अखंड नामस्मरण करत, टाळ मृदगांचा गजरात वातावरण अधिकच भक्तीमय बनला आहे.
या भक्तीमय वातावरणात भक्तीरस ओसंडून वाहत होता. तर श्रींच्या पालखीसोबत असलेल्या सूमारे 700 वारकर्यांचे सोालपूर शहरातील श्री संत नाभिक सेना संस्थेच्यावतीने मोफत दाढी, कटींग करण्यात आले.