Solapur Crime : घरासमोर गाणी वाजवण्यास विरोध केल्याने गर्भवतीला भिंतीवर आपटून मारले; नऊ महिन्याच्या गर्भाचाही मृत्यू

सोलापूरच्या अलकुंटे चौकातील भयानक घटना
AI Image
AI Image
Published on
Updated on

सोलापूर : घरासमोर साऊंडवर गाणी वाजवण्यासह गोंधळ घालू नका, असे सांगितल्याने एका तरुणाने माहेरी आलेल्या गरोदर तरुणीचा गळा आवळून तसेच तिचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील अलकुंटे चौकात घडला.

सोनी गणेश रामपुरे (19, रा. अलकुंटे चौक, उत्तर सदर बझार, सोलापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. बापू सुरेश आरगोळ (26) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेत तरुणीच्या गर्भाचाही दुर्दैवी अंत झाला. संशयितास अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

तरुणीच्या घरासमोरच लावला होता साऊंड...

सोनी रामपुरे ही गर्भवती माहेरी आली होती. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्या घरासमोर संशयित बापू आरगोळ याने साऊंडवर मोठ्याने गाणी लावली होती. तसेच मोठ्याने आवाज करीत तो घरासमोर गोंधळ घालत होता. यावेळी सोनी हिची आई लक्ष्मी म्हेत्रे यांनी माझी मुलगी नऊ महिन्यांची गरोदर आहे, साऊंड बंद करा आणि गोंधळ थांबवा, असे सांगितले. परंतु बापू याने उलट लक्ष्मी म्हेत्रे यांना शिवीगाळ केली. सोनीचे लग्न त्याच्याशी झाले नाही हा राग मनात धरून त्याने भांडण सुरू केले. यावेळी सोनी ही भांडणात मध्ये आली असता बापू याने तिचा गळा आवळला आणि भिंतीवर डोके आपटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news