Solapur Crime: ब्रँडेड कंपन्यांचे बनावट शर्ट तयार करणाऱ्यास पकडले

दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त
Solapur Crime: ब्रँडेड कंपन्यांचे बनावट शर्ट तयार करणाऱ्यास पकडले
Published on
Updated on

सोलापूर : टॉमी हिलफ्‍लायर युरोप बी.व्‍ही., कॅल्‍विन क्‍लिन ट्रेडमार्क ट्रस्‍ट या कंपन्यांचे बनावट लोगो वापरुन शर्ट तयार करणाऱ्यास शहर गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी पकडले. त्‍याच्‍याकडून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

याप्रकरणी अजय प्रशांत सुरा (वय २०, रा. गोदुताई विडी घरकुल, कुंभारी) याच्‍या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र सोहनसिंग राजपूत (वय ४०, रा. मु. बिरोलिया, पाली, राजस्थान) यांनी फिर्याद दिली.

दिल्‍लीतील एलयुडीकेशन या कंपनीकडे टॉमी हिलफ्‍लायर युरोप बी.व्‍ही., कॅल्‍विन क्‍लिन ट्रेडमार्क ट्रस्‍ट या कंपन्यांचे कॉपीराईड व ट्रेडमार्क हक्‍क आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news