Dr. Smita Yogesh Jadhav : डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीचा सोलापुरात जल्लोष

फटाके फोडून, पेढे भरवत करण्यात आला उत्साह
Dr. Smita Yogesh Jadhav
डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीचा सोलापुरात जल्लोष
Published on: 
Updated on: 

सोलापूर : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी) पुणेच्या प्रभारी कुलगुरु डॉ. स्मिता जाधव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी भाजपने उमेदवारी दिली. त्याबद्दल सोलापुरात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडण्यात आले, त्यानंतर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

डॉ. स्मिता जाधव यांना सासर आणि माहेरची राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. महिला सक्षमीकरण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. डॉ. डी. वाय. पाटील पिंपरीच्या प्रभारी कुलगुरुपदाबरोबर पुढारी पब्लिकेशनच्या संचालिका, टोमटो ९४.३ एफएम, आपलं एफएम ९१.९ च्या कार्यकारी संचालक व कस्तुरी क्लबच्या त्या अध्यक्षा आहेत. डॉ. स्मिता पाटील यांच्या उमेदवारीचे पदवीधर मतदारांकडून स्वागत होत असून, त्यांच्या नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वाला संधी मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे विभागात युवकांसाठी चांगले नेतृत्व मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news