Solapur News : जातपडताळणी त्रुटींची माहिती आता व्हॉटस्ॲ‌पवर

अर्जदारांना संदेशाद्वारे सूचना; कागदपत्रांची पूर्तता करणेही होणार सोपे
Solapur News
जातपडताळणी त्रुटींची माहिती आता व्हॉटस्ॲ‌पवर
Published on: 
Updated on: 

आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : राज्यातील सर्वच विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून यापुढे अर्जदारांनी दिलेल्या प्रस्तावातील त्रुटींची माहिती त्यांच्या व्हॉटस्ॲ‌पवर कळणार आहे. तर अर्जदारांना समितीच्या कार्यालयात न जात त्रुटीतील आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही याच माध्यमातून करणे अधिक सोयीचे होणार आहे. यामुळे, अर्जदारांचा वेळ व पैसाही वाचणार असून, अर्जांची निर्गतही जलद होण्यास मदत होणार आहे.

जातवैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर समितीकडून संबंधित प्रस्तावाची अधिकारी स्तरावरून छाननी केली जाते. छाननी प्रक्रियेत कागदपत्रांतील कमतरता आणि पुराव्यांमधील विसंगती अथवा इतर तांत्रिक त्रुटी आढळल्यास अर्जदारांना त्याची माहिती ई-मेलद्वारे तर दिली जाते. यापुढे ही माहिती व्हॉटस्ॲपवरही दिली जाईल.

समितीकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर अर्जदारांना संबंधित संकेतस्थळावर लॉगिन करून मागणी केलेली कागदपत्रे अपलोड करता येणार आहे. तसेच विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता करावी. अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीही अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.