सोलापूर : अनगर अप्पर तहसील कार्यालयाला मुख्यमंत्र्यांची तात्पुरती स्थगिती

मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने निवेदन दिल्यानंतर निर्णय
Chief Minister eknath shinde
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नव्यानेच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाला स्थगिती देण्याच्या संदर्भात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (दि.३०) भेट घेतली. व हे कार्यालय रद्द करण्याची मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर समितीने दिलेल्या निवेदनावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूलच्या अप्पर मुख्य सचिवांना लाल शाईने शेरा मारत कार्यालयाला तात्पुरती स्थगिती दिली. निवेदन समाज माध्यमावर व्हायरल होतास मोहोळ शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Chief Minister eknath shinde
Asadhi Wari 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला; वारीतील दिंड्यांना 3 कोटी रुपयांचे वितरण

शासनाने अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करत त्याला पेनुर नरखेड शेटफळ व अनगर ही मंडळ जोडत ४३ गावांचा समावेश केला होता. त्यामुळे पेनुर, शेटफळ व नरखेड या मंडलमधील तसेच मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. शनिवारी (दि.२७) मोहोळ बंद केले होते. अनगर येथे झालेल्या या अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाच्या विरोधात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची स्थापना करून त्या माध्यमातून सर्वपक्षीय लढा उभा करण्यात आला होता.

Chief Minister eknath shinde
Eknath Shinde: ‘गड्या आपला गाव बरा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले ‘दरे’ गावात

या अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीतील दिपक गायकवाड, उमेश पाटील, चरणराज चवरे, राजाभाऊ खरे, संतोष पाटील, विजयराज डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, महेश चिवटे, मुबीना मुलाणी, नागेश वनकळसे,संंजय क्षीरसागर, अशोक भोसले, सत्यवान देशमुख, विक्रम देशमुख, रमेश माने,मुकुंद आवताडे, गणेश गावडे,ज्ञानेश्वर पाटील,वैभव देशमुख ,विकास वाघमारे, बाळासाहेब चवरे, लखन पवार आदींनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व हे नवीन कार्यालय रद्द करावे अशा मागणीचे निवेदन दिले.

Chief Minister eknath shinde
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

अनगर हे गाव तालुक्याच्या एका कडेला असून त्याला लगतच २ कि.मी. अंतरावर माढा तालुका आहे. माढयामध्ये तहसिल कार्यालय असून नवीन कार्यालय सुरू करताना सरकारने नागरिकांच्या सोईचे ठिकाण न पाहता काही लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय घेतला असून पेनुर, नरखेड व शेटफळ या महसुल मंडळातील गावांना यातून अडचणी निर्माण होतील, असे निवेदन समितीने मुख्यमंत्र्यांना दिले.त्यानंतर या निवेदनावरच निवेदनावर स्वाक्षरी करत महसूलच्या अप्पर मुख्य सचिवांसाठी शेरा मारत अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news