

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील मौजे अकोले येथे बेवारस मृतदेह आढळून आला आहे. मौजे अकोले (बु) गावाच्या शिवारात कान्हापुरी (ता.पंढरपूर) येथे हा संशयास्पद मृतदेह टेंभुर्णी पोलिसांना आढळला. या इसमाच्या अंगावर अनेक गंभीर जखमा असून त्याची मोटारसायकल चार किमी अंतरावर बेंबळे हद्दीत बेवारस सापडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना २० जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
चंद्रकांत उर्फ आदिक बाबा पवार (रा.कान्हापुरी,ता.पंढरपूर) असे मृताचे नाव आहे. तो अकोले (बु)-बेंबळे रस्त्यावर रोडचे कडेला पोपट पांडुरंग काळे यांचे शेताजवळ उसाच्या पिकात मृतावस्थेत पडलेला होता. सुरुवातीस तो अनोळखी इसम मयत अवस्थेत बेवारस पडलेला दिसल्याने स्थानिक शेतक-यांनी दिसून आला होता. अकोले (बु) गावचे पोलीस पाटील भालचंद्र तुकाराम परबत-पाटील यांना मिळाली.त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहून ही माहीती टेंभुर्णी पोलिसांना मोबाईलवरुन दिली.