Solapur |मुरूम उपसा अहवालासाठी 1 लाख लाचेची मागणी करूनही रक्कम स्वीकारली नाही, संशय आल्याने लाचखोर मंडल अधिकाऱ्याला एसीबीने पकडले

Solapur | मुरूम उपसा अहवालासाठी 1 लाख लाचेची मागणी करूनही रक्कम स्वीकारली नाही, संशय आल्याने लाचखोर मंडल अधिकाऱ्याला ACB ने पकडले
bribery
bribery Pudhari
Published on
Updated on

सोलापूर - विहिरीतील मुरूम उपसा करण्यासाठी स्थळ पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे येथील मंडल अधिकारी विजयकुमार माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्याच्यावर सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bribery
Jalgaon Crime |पत्नी पाठोपाठ मुलगाही अंध; क्रूर पती, सासूने दोघांनाही विहिरीत ढकलले, साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

तक्रारदार हा शेतीसोबत मुरूम उपशाचे काम करतो. विहीर खोदाईतून निघालेल्या मुरुमाची वाहतूक करण्यासाठी त्याने उत्तर सोलापूर तहसीलदारांकडे रितसर अर्ज केला होता.

त्यानंतर तहसीलदारांनी तिन्हे मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना स्थळ पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तक्रारदाराने माने यांच्याशी संपर्क साधल्यानंतर स्थळ पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी माने याने एक लाख रुपयांची मागणी केली.

bribery
अमित शाहांनीच मला दिल्लीला बोलावले

दरम्यान, माने याने लाचेची मागणी करूनही लाच स्वीकारली नव्हती. याचा संशय आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मानेला लाच मागितल्याबाबत तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news