Reel Star Rohini Paradhye Death : प्रसिद्ध रीलस्टार रोहिणी पाराध्येने उचलले टोकाचे पाऊल, हॉटेलच्या किचनमध्ये संपवले जीवन

Reel Star Rohini Paradhye Death : मंगळवेढ्यात खळबळ, कारण अस्पष्ट
Reel Star Rohini Paradhye Death
रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्येने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.Pudhari
Published on
Updated on

Reel Star Rohini Paradhye Death

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेली रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५, रा. ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा) हिने अज्ञात कारणावरून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील त्यांच्याच मालकीच्या हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने तिने गळफास घेतला.

पाराध्ये दांपत्य होते सोशल मीडियावर सक्रिय

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर सक्रिय होते. विविध सामाजिक विषय आणि खाद्यपदार्थांवरील त्यांचे रील्स सोशल मीडियावर लोकप्रिय ठरले होते. याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी ब्रह्मपुरी येथे राष्ट्रीय महामार्गालगत खवय्यांसाठी हॉटेल ग्रामपंचायत सुरू केले होते. हा व्यवसाय चांगला स्थिरावला होता आणि ते नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत होते.

Reel Star Rohini Paradhye Death
Ludo Game Murder | कल्याणात लुडो गेममुळे वाद टोकाला : मामाने 17 वर्षीय भाच्याला झोपेतच संपवले!

हॉटेलच्या किचनमध्येच जीवन संपवले

मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रोहिणी हिने हॉटेलच्या स्वयंपाकघरात जाऊन छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच पती निलेश पाराध्ये यांनी तिला तातडीने मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.

Reel Star Rohini Paradhye Death
Cricket Selection Tragedy |वेदनादायी! टीममध्ये निवड न झाल्याने १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचलले टोकाचे पाऊल

रोहिणीने टोकाचे पाऊल का उचलले, कारण अस्पष्ट

रोहिणीने कोणत्या कारणास्तव जीवन संपवले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पती निलेश पाराध्ये यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news