मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांच्या भेटीला

Pandharpur Mangalvedha Assembly | पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढविण्याची शक्यता
Anil Sawant meets Sharad Pawar
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. Pudhari News Network
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या व भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळणार आहे. हे गृहीत धरून अनिल सावंत यांनी तुतारी हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्री सावंत यांच्याविरोधात बंड करीत पुतण्या अनिल सावंत हे शरद पवार यांना भेटले आहेत. या भेटीत त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यापुढे सावंत काका- पुतण्यामध्ये राजकारण सुरू होण्य़ाची चिन्हे दिसू लागली आहे.

पंढरपूर, मंगळवेढा मतदार संघात अनेक जण इच्छुक

पंढरपूर, मंगळवेढा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके ही इच्छुक

विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अनिल सावंत इच्छुक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके हे दोघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हे दोघेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

अनिल सावंत तुतारी हाती घेणार 

अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे त्यांचे तुतारी हाती घेण्याचे मनसुबे दिसत आहेत.

Anil Sawant meets Sharad Pawar
सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 282 कोटी मंजूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news