मार्ग फौंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांनी घेतली खा. शरद पवारांची भेट

द. मतदारसंघात विकासकामांसाठी ‘तुतारी’ हाती घेण्याचे दिले संकेत
Solapur News
दक्षिण सोलापूर : मतदारसंघातील सद्य परिस्थितीवर खा. शरद पवारांशी चर्चा करताना संतोष पवार.Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

मद्रे येथील मार्ग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मोती बागेतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे संतोष पवार तुतारी हाती घेतील का ? अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. दोघांनी सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली.तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही संतोष पवार यांनी शरद पवारानकडेे दर्शवली. यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खा. पवार यांच्याकडून संतोष पवार तुतारी हाती घेतील का? अशी चर्चा मतदारसंघात रंगत आहे. सध्या हा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहेत.

Solapur News
शरद पवार गटाकडून आता ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ मोहीम

ऐनवेळी जागा वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खा. पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. शिवाय मार्ग फौंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि गरिबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमाविषयीची माहिती सविस्तरपणे शरद पवारांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news