

सोलापूर : कामदगार आयुक्त कार्यालयाकडून नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना अनेक शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. यांच्यासाठी शासनाकडून काही लोककल्याणकारी योजना राबवण्यात येते.
मुलींच्या लग्न कार्यासाठी आर्थिक मदत व शिक्षणासाठी सुध्दा आर्थिक सहाय्य मिळतो. याशिवाय अन्य सुविधांचा लाभ घेता येते. मात्र, यासाठी सुरक्षा रक्षकांचे कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी होणे आवश्यक असून 50 लाखांचे संरक्षणही त्यांना मिळणार आहे. मात्र, शहर जिल्ह्यात 212 सुरक्षा रक्षकांनीच या कार्यालयाकडे नोंदणी केली आहे.
कामगार विभागाकडून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्यांसाठी कल्याणकारी योजना राबवली जाते. तसेच, नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांसह कुटूंबातील व्यक्तींना काही आजारावरील उपचारासाठी आर्थिक सहाय्याची तरतूदही यात केली आहे. तसेच, उच्च शिक्षण घेणार्या मुलांना विविध अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रम निहाय व तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था या योजनेत आहे. याशिवाय, मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत दिली जाते. सुरक्षा रक्षकांना साहित्याच्या संचासह संसारोपयोगी साहित्यही वाटप केली जाते. सुरक्षा कवच म्हणून विमा संरक्षणाची तरतूद या योजनेत केला आहे. तसेच, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत नोंदणी करून विमा संरक्षण घेता येते.
नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिलीे जाते. अत्यावश्यक सेवेत सुरक्ष रक्षकांचा सेवेत समावेश केला आहे. यामुळे, यांना रेल्वेतून प्रवास करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
कामगार विभागाकडून सुरक्षा रक्षकांनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यांना कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करावी लागेल. तरच, या हे रक्षक सर्व सुविधा मिळण्यास पात्र आहेत. शिष्यवृत्तीसह आरोग्य सुविधा मिळण्यास ते पात्र ठरतील.
नीलेश येलगोंडे, कामगार आयुक्त, सोलापूर