

Pune Graduate Constituency
केम : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचाराला केम आणि परिसरात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. केम येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप तळेकर यांनी डॉ. जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य भगवंत, मनोज वासकर आणि पुढारीचे पत्रकार संजय जाधव यांनी दिलीप तळेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आणि उमेदवाराच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तळेकर यांनी डॉ. जाधव यांना पाठिंबा जाहीर केला.
प्रचाराच्या अनुषंगाने परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांनाही भेटी देण्यात आल्या. यामध्ये श्री उत्तरेश्वर हायस्कूल, शारदाताई गोविंद पवार विद्यालय, राजाभाऊ तळेकर विद्यालय, नूतन माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आश्रमशाळा आणि वडशिवणे येथील अजित पवार विद्यालयाचा समावेश आहे.
या भेटींदरम्यान डॉ. स्मिता जाधव यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच पदवीधर मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. केम आणि परिसरातील या प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.