Dr. Smita Jadhav : डाॅ. स्मिताताई जाधव यांच्याकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

Pune Graduate Constituency Election :
पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले.
पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले.
Published on: 
Updated on: 

बारामती : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी मंगळवारी (दि. २०) बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.

डॉ. जाधव यांनी स्मृतिस्थळी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. “महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारे, शिस्तप्रिय प्रशासक आणि कार्यकर्त्यांचे हक्काचे आधारस्तंभ असलेले दादा आज आपल्यात नाहीत, ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे,” अशा भावना डॉ. जाधव यांनी व्यक्त केल्या.

त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी डॉ. जाधव यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या; तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही दिली.

“दुःखाच्या प्रसंगात खंबीरपणे उभ्या राहून दादांचा लोकसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या सुनेत्राताई प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत,” या शब्दांत डॉ. जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते पांडुरंग कचरे, ॲड. गोविंद देवकाते, अरविंद लाखे-पाटील, दत्ता पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news