सोलापूर : भोसेची कन्या प्रतीक्षा माळी हिची भाभा अणुसंशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून निवड

सोलापूर : भोसेची कन्या प्रतीक्षा माळी हिची भाभा अणुसंशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून निवड

भोसे (क.) : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील प्रतीक्षा भारत माळी हिची भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झालेली मुलगी आज देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करणार असल्याने भोसे ग्रामस्थांची मान अभिमानाने उंचावली आहे.

प्रतीक्षा माळी हिचे प्राथमिक शिक्षण रानमळा (भोसे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय, भोसे येथे, तर 12 वीपर्यंतचे शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे झाले. लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या प्रतीक्षा हिचा कल विज्ञान शाखेकडे होता. तिने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात भूगर्भशास्त्र शाखेत पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भूगर्भ शास्त्र शाखेतच पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पूर्ण केले. भूगर्भ शास्त्राची अत्यंत आवड असलेल्या प्रतीक्षा हिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी आयआयटीमध्ये मिळालेला प्रवेश सोडून दिला. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वतीने 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिची भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. संपूर्ण देशातून फक्त 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये प्रतीक्षाने यश संपादन केले आहे. एका खेडेगावातील मुलगी उच्च शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज देशासाठी आपले योगदान देणार आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news