Post Office SIP: गुंतवणूकदारांसाठी पोस्टाची एसआयपी

आधुनिक योजनांसह बचतीचे नवे पर्याय खुले होणार
Post Office
Post Office
Published on
Updated on

सोलापूर : देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्टाचे विस्तृत जाळे आहे. याच माध्यमातून आता ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागातील गुंतवणूकदारांना एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येईल. तेही घरपोच असेल. अशा प्रकारच्या आर्थिक सेवेचा फायदा नागरिकांना सहज मिळण्याची सोय पोष्टाने केली आहे. पद्धतशीर गुंतवणूक (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सेवेची सुरुवात करण्यात येत असून, यामुळे पोष्टाच्या पारंपरिक बचत व ठेवीच्या योजनेसह आधुनिक गुंतवणुकीची सोय उपलब्ध होईल. याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

पोष्ट व असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांच्यातील करारानुसार पद्धतशीर गुंतवणुकीची सेवा नागरिकांसाठी राबवली जात आहे. देशभरात पोस्टाचे मोठे जाळे असून याचा उपयोग एसआयपी गुंतवणूक उत्पादने थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा हेतू आहे. ही गुंतवणुकीची सेवा नागरिकांच्या दारापर्यंत जाईल.

आजतागायत म्युच्यअल फंड व पध्दतशीर गुंतवणुकीचा पर्याय हा शहरी व विशिष्ट भागात सीमित होता. पोस्ट आता शहर, ग्रामीण, आणि दुर्गम भागातील मध्यमवर्गीय नागरीकांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देत आहे. पोस्ट ऑफिस व पोस्टमनच्या मदतीने केवायसी प्रक्रिया, योजनांची माहिती, गुंतवणुकीची नोंदणी सुलभपणे होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना गुंतवणूकीसाठी चालना मिळेल. पध्दतशीर गुंतवणूक दारांच्या मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतर होणाऱ्या गैरसोयी दूर करून दीर्घकालीन अर्थ नियोजन सोपे होण्यास मदत होईल.

विस्तृत माहिती

देशभरातील पोस्ट ऑफिसमधून सर्वच क्षेत्रातील गुंतवणूकदारांना विविध म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या योजनांची विस्तृत माहिती दिली जाईल. गुंतवणूक निवडीचा पर्याय निवडता येईल. यामुळे, आर्थिक साक्षरता व जनजागृती वाढीला चालना मिळण्यास मदत होईल.

गुंतवणूक करण्याची संधी

आर्थिक क्षेत्रातील नामवंत बँका, मोठ्या कंपन्या, एसबीआय म्युच्युअल फंड, निपॉन इंडिया म्युच्युअल फंड, युटीआय म्युच्युअल फंड अशा प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी ग्रामीणसह शहरी भागातील नागरिकांना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news