माढा लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली: धैर्यशील मोहिते-पाटील

माढा लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली: धैर्यशील मोहिते-पाटील

केम, पुढारी वृत्तसेवा : माढा लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबाची राहिलेली नाही. कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे जनता जनार्दनच ठरवेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

केम येथे प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

या सभेत करमाळा तालुका भटक्या विमुक्त जमाती संघटना, केम येथील मुस्लिम युवक संघटना व जुनी सेवानिवृत्त पेन्शन संघटनेने मोहिते- पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.

मोहिते पाटील म्हणाले की, ही निवडणूक मोहिते- पाटील यांनी लढवली नाही, तर इथून पुढे आमच्याकडे यायचे नाही, असा प्रेमळवजा दम तरुणांनी दिला. त्यामुळे मी अनेक गावांचा दौरा केला. सर्व ठिकाणी तरुणांनी काही झाले, तरी मी ही निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या अस्तित्वासाठी, जनतेसाठी, स्वाभिमानासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यासाठी कोणतेही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असा निर्धार केला.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख शाहू फरतडे, युवा सेनेचे समाधान फरतडे, करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, देवानंद बागल, अतुल पाटील, सोलापूर जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ज्येष्ठ नेते दिलीप तळेकर, गोरख तळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा चव्हाण, सरपंच सारिका कोरे, शिवसेनेचे सतीश खानट, श्रीहरी तळेकर, उत्तरेश्वर तळेकर अविनाश तळेकर, माजी सरपंच अजित तळेकर, माजी सभापती शेखर गाडे, चेअरमन बापूराव तळेकर, युवा सेनेचे सागर तळेकर, किरण तळेकर, कंदरचे सरपंच मौला मुलाणी, पोपट साळुंखे, अविनाश तळेकर, शिवराज जगताप आदी उपस्थित होते.

नाना जगताप यांनी सूत्रसंचालन केले. चेअरमन अरुण लोंढे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news