श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या टोकन दर्शन सुविधेचा मार्ग मोकळा

दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत निर्णय
Solapur News
पंढरपूर ः स्कायवॉकचे संकल्पचित्र.Pudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मंडप, दर्शन रांग व स्कायवॉकच्या कामासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या आराखड्यास निधी मंजूर झाल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या टोकन दर्शनाचा मार्गही आता मोकळा होणार आहे. टोकन दर्शन पद्धतीमुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळण्यास मदत होणार आहे. मंदिर समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

Solapur News
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित
Summary

...या असतील सुविधा

  • भाविकांना दर्शन मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल.

  • अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाईल. कमीत कमी वेळेत दर्शन व्हावे. यासाठी टोकन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे.

  • निश्चित केलेल्या वेळेतच त्यांना मंडप व रांगेत प्रवेश दिल्याने गर्दीचेही नियंत्रण होणार आहे. याशिवाय यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या चार वार्‍या भरतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला होता. हा आराखडा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीसमोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केला. या आराखड्यास समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

पंढरपूर : विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी

भाविकांसाठी प्रशस्त दर्शन मंडप

भाविकांसाठी अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सुमारे 16 हजार चौरस मीटरच्या या मंडपात पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर सहा हजार भाविकांची सोय करण्यात येईल. या सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना स्कायवॉक पद्धतीच्या एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल. यामुळे भाविकांना सुरक्षित, सुसह्य आणि सोयी-सुविधांनी युक्तअशी दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे. स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही. भाविकांचा दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news