रेल्वेच्या निर्णयाचा प्रवाशांना फटका

दौंड-हडपसर डेमूचा पुण्यापर्यंत विस्तार; गाडी सुटणार हडपसरवरून
Passengers hit by Railway's decision
रेल्वेच्या निर्णयाचा प्रवाशांना फटकाFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

दौंड-पुणे डेमूने प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला. पण, पुण्यावरून सोलापूरला येणार्‍या सोलापूरकरांची निराशा केली. कारण, हडपसर-सोलापूर डेमू ही गाडी पुण्यातून न सुटता हडपसरपर्यंत रिकामी येत सोलापूरला येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा हजारो प्रवाशांना फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्त केल्या.

Passengers hit by Railway's decision
मुंबई-पुणे एक्स्प्रेस रेल्वे रद्द! बदलापूर-वांगणी ट्रॅकवर पाणी येण्याच्या शक्यतेमुळे निर्णय

शनिवार 5 ऑक्टोबरपासून दौंड-हडपसर डेमू पुणे स्थानकांपर्यंत विस्तारित करण्यात आली. हजारो प्रवाशांची एकीकडे सोय झाली. पण, दौंड-हडपसर गाडीचा रेक हडपसर-सोलापूर धावतो. रेल्वे प्रशासनाने हडपसर-सोलापूर डेमु सोलापूरकडे येताना अद्याप हडपसर स्थानकावरूनच सोडत असल्याचे सांगितले. पुणे ते हडपसर स्थानकापर्यंत ही डेमु रिकामीच येत आहे. प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यातून सोलापूरला येणार्‍या प्रवाशांना हडपसर स्थानक येथे येऊन यागाडीने सोलापूर गाठावे लागत आहे. पण, ही डेमू हडपसर ऐवजी पुण्यातून सुरू झाल्यास ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. दौंड-पुणे आणि हडपसर-सोलापूर डेमूचा रेक शेअरिंग केला आहे. यामुळे हडपसर-सोलापूर डेमूच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तरी रेल्वे प्रशासनाने हडपसर सोलापूर डेमू ही पुणे स्थानकातून सोडावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

हडपसर-सोलापूर डेमूचे नवे वेळापत्रक

हडपसर येथून सकाळी 8.10 वाजता सुटेल. लोणी-8.23, उरुळी-8.35, केडगाव-9.4, दौंड-9.35 आणि सोलापूरला दुपारी तीन वाजता पोहचेल.

Passengers hit by Railway's decision
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, निर्बंध शिथील करण्‍याबाबत महत्त्‍वाचा निर्णय
मध्य रेल्वेने पहाटे दौंडहून निघणारी दौंड-हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेली. मात्र, रिव्हर्सल झाल्यावर ही डेमू सोलापूरकडे येताना पुणे स्थानकाहून न निघता हडपसर-सोलापूर डेमु अशीच धावणार आहे. यामुळे पुणे ते हडपसरदरम्यान डेमू रिकामी धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे हडपसर-सोलापूर डेमू पुणे जंक्शनहूनच सोडण्याची गरज आहे.
- कनिष्क बोकेफोडे, रेल्वे अभ्यासक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news