

सुरेश गायकवाड
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या गोरगरीब भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचे प्रस्तावित आहे. काशी विश्वनाथ तसेच तिरुपती बालाजीच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्यात आहे. यामुळे भविष्य वारीकरांना पंढरपूरची वारी अधिक सुखकर होईल.
पंढरपूरचे जुने पुरातन रूप पालटणार असले तरी ऐतिहासिक वास्तू, वाडे जतन करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही आषाढी यात्रा परंपरांनुसार भरत आलेलेल्या जुन्या पंढरपुरात भरणारी शेवटची यात्रा ठरणार आहे. सध्या आषाढी यात्रेत आलेल्या लाखो भाविकांना विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, वाळवंट येथे अरुंद रस्त्यांमुळे चेंगराचेंगरीचा धोका असतो.
कॉरिडॉर झाल्यानंतर असे प्रकार घडणार नाहीत. कॉरिडॉरमध्ये मंदिर, मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, नदीपात्राची घाटबांधणी, चंद्रभागेत कायमस्वरूपी स्नानाची व्यवस्था, पालखी मार्ग या ठिकाणी भाविकांना दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कॉरिडॉर होणे भाविकांच्या दृष्टीने व स्थानिक नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्व पूर्ण पाऊल ठरणार आहे.