Pandharpur Election | उर्दू शाळेतील गोंधळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हे; ईव्हीएमवरील खुणांमुळे वाद वाढला

Pandharpur Election | पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उर्दू शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे.
Election
Election file photo
Published on
Updated on

पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके तसेच भगीरथ भालके यांनी ईव्हीएम मशीनवर काही खुणा असल्याचा संशय व्यक्त केला होता. या आरोपांवरून दोघांनी मतदान केंद्रातील नियमानुसार कृती होत नसल्याचे सांगत मोठा गदारोळ केला. या घटनेदरम्यान त्यांच्या सोबत आलेल्या पाच जणांनी थेट मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे.

Election
Pannalal Surana Passes Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

घटनेची सविस्तर माहिती अशी की, उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर शनिवारी सकाळी अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रणिता भालके मतदानाची पाहणी करण्यासाठी केंद्रात अधिकृतपणे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेही असल्याची माहिती मिळली. मात्र, अधिकृत परवानगी फक्त प्रणिता भालके यांना होती, इतर पाच जणांकडे प्रवेशाची कोणतीही परवानगी नव्हती.

केंद्रप्रमुख दशरथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हे पाच जण विनापरवाना मतदान केंद्रात शिरले आणि मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे ईव्हीएम मशीनचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रातील पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गोंधळ घालत जबरदस्तीने केंद्रात प्रवेश केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीत असेही नमूद केले आहे की, ईव्हीएम मशीनवर काही खुणा दिसल्याचा मुद्दा घेऊन भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांनीही मतदान केंद्रात तणाव निर्माण केला. अधिकृत अधिकारी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाही दोघांनी जोरदार आक्षेप घेतला. या वादामुळे काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती.

मतदान केंद्रातील CCTV फुटेजसह संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, पोलिसांनी सध्या पाच अनधिकृत व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. मतदान केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणी विनापरवाना प्रवेश करणे गंभीर गुन्हा मानला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news