Dilip Dhotre accident: मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला अपघात

धोत्रे यांच्यावर पुण्यात उपचार सुरु : गाडीचा चक्काचूर
Dilip Dhotre accident
Dilip Dhotre accidentPudhari
Published on
Updated on

पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पंढरपुरातील मनसेचे वजनदार नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉच्युनर गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे भीषण अपघात झाला. यामध्ये धोत्रेंच्या छातीला व पायाला दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती समजताच पंढरपूरसह जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. धोत्रेंच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. यासाठी समर्थकांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.

धोत्रे हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांसह महामार्ग पोलिसांच्या मदतीने दिलीप धोत्रे यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनसे नेते प्रशांत गिड्डे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सांगितले.

दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. अपघातस्थळावरील परिस्थिती, वाहनाचा वेग तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

रात्री अपघात झाला आहे. गाडीचे नुकसान झाले आहे. मात्र, किरकोळ दुखापत वगळता मी सुदैवाने यातून बचावलो आहे. माझी प्रकृती ठिक आहे.
- दिलीप धोत्रे मनसे नेते, पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news