पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरास केलेली द्राक्षे तासात गायब

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरास केलेली द्राक्षे तासात गायब

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : आमलकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आणि सोळखांबी व सभामंडप येथे हिरव्या व काळ्या द्राक्षांची सुंदर आरास करण्यात आली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करण्यात आलेली द्राक्षांची आरास भाविकांना मनमोहक दिसत होती. मात्र आरास केल्यानंतर तासाभरात द्राक्षे गायब झाली. त्यामुळे ही आरास केवळ सकाळी दर्शनाला आलेल्या भाविकांनाच पाहता आली. त्यानंतर आलेल्या भाविकांना आरास पाहता आली नाही. ही द्राक्षे भाविकांना प्रसाद म्हणून वाटली की, मंदिर समितीने काढून ठेवली, याबाबत भाविकांमधून उलटसुलट चर्चा सुरू होती.

सुमारे एक टन द्राक्षांचा वापर करून मनमोहक आरास करण्यात करण्यात आली होती. यामुळे मंदिरात द्राक्षांचे बन अवतरल्याचे चित्र होते. मंदिराचे स्वरूप नयनरम्य दिसत होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही मनमोहक आरास पाहून समाधान व्यक्त केले जात होते.

आमलकी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात, सोळखांबी, सभामंडप येथे पाना-फुलांची आरास करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीबेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते. मंदिरात सजावट करण्यासाठी भाविकही उत्सुक असतात. भाविकांकडून पाना-फुलांचा व डेकोरेटर्सचा खर्च करत मोफत सेवा दिली जात आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी संपूर्ण मंदिरात, सोळखांबी, विठ्ठल सभामंडपात द्राक्षांची आकर्षक सजावट बाबासाहेब रामचंद्र शेंडे, पूनम बाबासाहेब शेंडे (रा. बारामती) व सचिन अण्णा चव्हाण (रा. पुणे) यांच्याकडून करण्यात आली आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रूप पाहण्यासाठी ोठ्या संख्येने भाविक पंढरीत 'श्रीं'च्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
'श्रीं'च्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना मंदिरात करण्यात आलेल्या मनमोहक आरासीचे दर्शन मिळत असल्याने भाविक मनोमनी सुखावले. मंदिर समितीच्या संकेत स्थळावरूनही घरबसल्या भाविकांना सुंदर आरासीचे दर्शन मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news