Pandharpur Collectorate | मोहोळचा विरोध डावलून पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

मोहोळचे नेते मंडळी आता काय भूमिका घेणार?
Additional Collector Office Pandharpur
Additional Collector Office PandharpurPudhari
Published on
Updated on

Additional Collector Office Pandharpur

मोहोळ : पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय विभागणी निश्चित झाली आहे. मात्र, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्यास तालुक्यातून यापूर्वी तीव्र विरोध करण्यात आला होता. मोहोळ तालुका पंढरपूरऐवजी सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच ठेवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती आणि विविध संस्थांकडून करण्यात आली होती.

पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावावर जून-जुलैमध्ये हरकती मागविण्यात आल्या होत्या. यावेळी मोहोळ तालुक्यातील भौगोलिक स्थिती आणि दळणवळणाचा मुद्दा पुढे करण्यात आला. मोहोळहून सोलापूर हे अंतर तुलनेने कमी असून, प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाणे नागरिकांना अधिक सोयीचे असल्याचे सांगत मोहोळ तालुका सोलापूरच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. माजी आमदार राजन पाटील यांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता, तर आमदार राजू खरे यांनीही महसूल मंत्र्यांकडे मोहोळचा समावेश सोलापूरमध्येच ठेवण्याची मागणी केली होती.

Additional Collector Office Pandharpur
Solapur MD Drug Sale : कुर्डूवाडीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणणारा अटकेत

या मागणीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ नगरपरिषद, अनगर नगरपंचायत तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून ठराव करून हरकती नोंदविण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, शासनाने २२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अंतिम आदेशानुसार मोहोळचा समावेश पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला आणि मोहोळ या सात तालुक्यांचा या कार्यालयात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर या निर्णयाचे स्वागत केले जात असले, तरी मोहोळचा सोलापूरशी असलेला प्रशासकीय संबंध कायम ठेवण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांची भूमिका आता काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे. शासनाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरही मोहोळचा प्रश्न पुन्हा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news