सोलापूर : विमानतळाचे आज मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

होटगी रोडवरील विमानतळावर दाखवणार कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
Online inauguration of the airport today by Modi
विमानतळाचे आज मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटनfile photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

होटगी रोड विमानतळाचे गुरुवारी (दि. 26) सायंकाळी 7 ते 8 या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. सोलापूर येथील विमानतळावर त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. होटगी रोडवरील विमानतळ कधी सुरू होणार, अशी चर्चा सोलापुरात होत होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे.

सोलापूर विमानतळ परिसरात आग | पुढारी

त्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे उद्घाटन होणार आहे. यासाठी पालकमंत्री, सर्व आमदार, खासदार तसेच महत्वाच्या अधिकार्‍यांना निमंत्रीत केले आहे. मोजक्याच लोकांची यादी जिल्हा प्रशासनाने पाठवली आहे. प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्यास आणखी एक किंवा दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. प्रातिनिधीक स्वरूपात सोलापूर-मुंबई, सोलापूर-पुणे अशी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news