उत्तर सोलापुर तालूका कबड्डी स्पर्धेत नृसिंह मुलीच्या संघाने मारली बाजी

अंतिम सामन्यात जिजामाता प्रशालेला 12 गुणांनी नमवत पटकावसे जेतेपद
Kabaddi winning girls team
कब्बडी विजेता मुलींचा संघPudhari Photo
Published on
Updated on

पाकाणी येथील श्री नृसिंह विद्यालयाच्या मुलींच्या संघाने बाजी मारत प्रथम तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. मंगळवारी (दि.30)पाकणी येथील नृसिंह विद्यालयाच्या मैदानावर सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व पंचायत समिती उतर सोलापूर यांच्या विद्यमाने तालुकास्तरी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये १४ वर्षाखालील वयोगटामध्ये एकूण 13 संघानी कबड्डी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

Kabaddi winning girls team
Paris Olympics Shooting | कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कमाल! ५० मीटर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये धडक

या स्पर्धेमध्ये श्री नृसिंह विद्यालय पाकणी प्रशालेच्या मुलीच्या संघाने अंतिम सामना जिजामाता प्रशाला कोंडी यांच्याविरुद्ध 12 गुणांनी जिंकून उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयामध्ये संघातील खेळाडू मयुरी येलगुंडे, प्रीती साठे, मृणाली आडके, सोनाली येलगुंडे, श्रीदेवी शिंदे, श्रद्धा ढोणे,यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवून संघास विजयी केले. या सर्व खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक किशोर गुंड,श्रीधर देशमुख , संकल्प लेंडवे ,गोरखनाथ घोडके व नागनाथ लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक हनुमंत जोडबोटे व संस्था सचिव सुबोध शिंदे यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news