सोलापूर : पूर्व वैमनस्यामधून सावत्र भाऊ आणि चुलत्यानी केला पुतण्याचा खून

करमाळा तालुक्यातील शेळगाव येथील घटना
Murder News
मृत ऋत्विक भोसलेPudhari Photo
Published on
Updated on

पूर्व वैमनस्यामधून सख्या चुलत्याने व सावत्र भावांनी मिळून पुतण्याचा खून केलाचा प्रकार उघड झाला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ऋतिक उर्फ गद्या काळ्या भोसले वय २० रां. शेलगाव तालुका करमाळा असे खून पूर्ववैमनस्यातून खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याची फिर्याद मृताची आईं मिथाला काळ्या भोसले वय ४५ रा. शेलगाव (वांगी) ता. करमाळा जि. सोलापुर हिने करमाळा पोलिसात दिली आहे.

किरण उर्फ इरण्या अप्रिशा भोसले, धर्मेंद उर्फ गंड्या अनिशा भोसले, लकेश धर्मेंद्र भोसले, पालेखान अप्रिशा भोसले, पाटलीन अप्रिशा भोसले सर्व रा.शेलगाव वांगी, ता. करमाळा, जि. सोलापुर, व इशा म्हरलाल काळे रा वडारवाडी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हा खूनाचा प्रकार दोन आगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास शेलगाव शिवारातील शेतामध्ये झाला आहे. घटनास्थळी जिल्हा उपअधीक्षक यावलकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

Murder News
Murder Case | मित्रानेच केला मैत्रणीचा खून; संशयित परप्रांतीय युवक गजाआड

याबाबतची हकीगत अशी की, मयत हा शेतामध्ये असताना मयताचे चुलते व सावत्र भाऊ यांनी मिळून जुन्या भांडणाच्या व शेताच्या वादातून त्याच्यावर तलवार कोयता अशा धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याच्या डोक्यावर, गालावर,पोटावर आदि ठिकाणी धारदार शस्त्राने हल्ला करून जागीच ठार मारले आहे. अशा आशयाची फिर्याद मयताची आई हिने करमाळा पोलिसात दिल्याने संबंधित संशयित आरोपींच्या विरोधात करमाळा भारतीय न्यायसंहितेच्या कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. गून्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव हे करत आहेत.

Murder News
करजंखेडामध्ये राजकीय वाद ठरला कर्दनकाळ; सरपंचाच्या मुलाचा निर्घृण खून

दरम्यान शेलगाव (विराचे) येथेही अज्ञात कारणावरून अज्ञात युवकांनी एकाचा खून केला होता. त्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती शेलगाव (वांगी) येथे झाली आहे. पारधी समाजातील युवक वर्ग आता शैक्षणिक प्रवाहात येत आहेत .ते कष्ट करून जगण्यासाठी प्रयत्न करत असतानाही दिसत आहेत .शेती, मजुरी तसेच शेळीपालन वगैरे व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. अशावेळी वेगवेगळ्या कारणाने त्यांच्यातील वादविवाद उफाळून येत आहेत. या दोन्ही घटनेमध्ये दोन्ही पारधी समाजाच्या युवकांचा मृत्यू यामध्ये झाला आहे. या गुन्ह्यातील सहाही आरोपी फरार आहेत .शोकाकुल वातावरणामध्ये शेलगाव येथे मयत ऋतीक याच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले .ऋतिकच्या पश्चात आई-वडील,भाऊ पत्नी, एक मुलगी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news