Murder Case | मित्रानेच केला मैत्रणीचा खून; संशयित परप्रांतीय युवक गजाआड

मलकापूर (ता. कराड) येथील सनसिटी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्यानेच आरूषीचा मृत्यू
Aarushi singh Girl dies after friend pushes her from building
मित्राने इमारतीवरून ढकलल्याने युवतीचा मृत्यू Pudhari File Photo
Published on
Updated on

मलकापूर (ता. कराड) येथील सनसिटी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून मयत आरूषी सिंग पडून नव्हे तर तेथून ढकलून दिल्यानेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय युवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी संशयित परप्रांतीय युवकाला गजाआड केले आहे. (Aarushi Singh Murder Case)

Aarushi singh Girl dies after friend pushes her from building
Yashshree Shinde Murder Case | 'यशश्री'च्या वडिलांचा बदला घेण्यासाठी दाऊदने 'ती'ला संपवले

आरूषी सिंग (वय २१, रा. जुरन छपरा रोड नंबर ३, मुजप्फरपूर एमआयटी मुसहाहरी मुजप्फरपूर, बिहार) असे त्या दुर्दैवी युवतीचे नाव आहे. याप्रकरणी ध्रुव राजेशकुमार छिक्कारा (वय २१, मूळ रा. हाऊस नंबर ६८४, गल्ली नंबर १, अशोक विहार गोहाना रोड सोनीपत, हरियाणा) या संशयितास अटक केली आहे.

याबाबत आरूषी हिची आई दीप्ती सिंग यांनी फिर्याद दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हंटले आहे, ३० जुलैला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरूषी हिला तिचा मित्र ध्रुव याने सनसिटी येथील आपल्या रूमवर बोलावून घेतले होते. तेथे ध्रुव याने तुझे दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर आहे असा संशय घेत आरूषी हिच्याशी वाद घातला.

या वादातून आरूषीला जाणीवपूर्वक धक्का मारून ध्रुव याने खाली ढकलून दिले आहे. या घटनेत डोक्याला गंभीर मार लागल्याने जखमी आरूषीला कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता असे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेतील संशयित ध्रुव हाही जखमी झाला असल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर वैद्यकीय पूर्तता करून गुरूवारी सायंकाळी त्यास अटक केली आहे. शुक्रवारी त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे असेही पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले आहे.

Aarushi singh Girl dies after friend pushes her from building
रोहित पवारांनी जामखेडला पळवलेले एसआरपीएफ केंद्र पुन्हा वरणगावात

दिल्लीत अभ्यासावेळी झाली होती ओळख...

संशयित ध्रुव आणि दुर्दैवी आरूषी यांची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी दिल्लीत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनीही एकाच ठिकाणी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता आणि ते दोघेही पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news