राष्ट्रवादीचे नेते, सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन

Mahesh Kothe | प्रयागराज येथे हृदयविकाराचा झटका
 Mahesh Kothe death
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर अभ्यासू नेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांचे सोमवारी (दि.13) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापुरातील झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोठे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोठे (Mahesh Kothe) यांनी निवडणूक लढवली होती. यात त्यांना अपयश आले होते. आतापर्यंत त्यांनी तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेचे महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवली. महापालिकेत त्यांचा मोठा दबदबा होता.

महापालिकेचे अनेकवेळा बजेट सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. बजेटवर ते अभ्यासू भाषण करत. कोठे यांच्या निधनामुळे राजकीय तसेच समाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. कोठे यांचे पार्थिक विशेष विमानाने सोलापुरात आणले जाणार आहे. मुरारजी पेठ येथील ‘राधाश्री’ निवास्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा नगरसेवक प्रथमेश कोठे आहे.

 Mahesh Kothe death
सोलापूर युनिफॉर्मचे हब होण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल राधाकृष्णन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news