सोलापूर युनिफॉर्मचे हब होण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल राधाकृष्णन

Governor C.P. Radhakrishnan
राज्यपाल सी. पी. राधाकृषणन यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आ. सुभाष देशमुखांसह मनुफॅक्चरर गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी युनिफॉर्मविषयी चर्चा केल्यानंतर.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : वेगवेगळ्या दर्जाचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील युनिफॉर्म कसे बनवता येईल व त्याचे मार्केटिंग कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावे. युनिफॉर्मचे उत्पादन सोलापुरात असल्यामुळे युनिफॉर्म हब व्हावे, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल सी.पी. राधाकृषणन शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर होते. त्यावेळी सोलापूर मॅन्युफॅक्चरर गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन यूनिफॉर्म गारमेंट उद्योगाबाबत चर्चा केली. तसेच युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभा करा. यासाठी मुख्यमंत्रीसोबत बैठक लावण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आ. सुभाष देशमुख, सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रकाश महानवर, निलेश शहा, अमित जैन, प्रकाश पवार, रमेश डाकलिया, वेंकटेश मेंगजी, रोहन बंकापूर उपस्थित होते. 18 ते 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बेंगलोर येथील युनिफॉर्म गारमेंट फेअरचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल राज्यपाल यांनी कौतुक केले. तसेच गारमेंट उद्योगाच्या विकासासंदर्भात देखील चर्चा केली. उद्योग वाढीसोबतच त्यातील बारकावे म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून उत्पादन कसे वाढवता येईल. त्याचे विक्री कसे करता येईल, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

स्किल्ड लेबर तयार करा

गारमेंट उद्योगाला लागणार्‍या स्किल्ड लेबर, आणि मशिन रिपेअर करणारे लेबर तयार करण्याकरिता सोलापूर युनिव्हर्सिटी मध्ये सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन सोबत टाईप करून त्याचे नियोजन कसे करता येईल यावरही विचार झाले. तसे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news