

Madha Aran missing youth body found
मोडनिंब : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला कार्तिक बळीराम खंडाळे (रा. मौजे अरण, ता. माढा) याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आज (दि.१९) सकाळी कालव्यामध्ये आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरण (ता. माढा) येथील कार्तिक बळीराम खंडाळे १५ जुलैपासून बेपत्ता होता. आज सकाळी जाधववाडी हद्दीतील कोरड्या कॅनल मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. फॉरेन्सिक टीम व श्वान पथक यांच्या साह्याने तपास सुरू आहे.
हा घातपात असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. त्याचे अपहरण करून खून झाल्याचा अंदाज आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.