जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये डोक्यात दगड घालून युवकाचा खून

जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये डोक्यात दगड घालून युवकाचा खून
जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये युवकाचा डोक्यात दगड घालून खून
जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये युवकाचा डोक्यात दगड घालून खून pudhari photo

सोलापूर : जुळे सोलापुरात आसरा पूल नजीक असलेल्या कल्याण नगर भागात एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून झाला. ही घटना आज सोमवारी (दि. १ जुलै) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. अविनाश हाक्के ( वय २५) असे युवकाचे नाव असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल पाठवला आहे.

जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये युवकाचा डोक्यात दगड घालून खून
Murder case | धक्कादायक ! डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून

अविनाश हाक्के मूळचा मोहोळ तालुक्यातील आहे. तो आपल्या नातेवाईकाकडे कल्याण नगर भागात आजीकडे राहतो. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मैदानात त्याचा खून झाल्याचे आज सोमवारी सकाळी उघडकीस आले आहे. यानंतर नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

अविनाशचा खून नेमका कशासाठी झाला? आणि कोणी केला? यांचा पोलिस तपास करत आहेत. विजापूर नाका पोलीस ठाणे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये युवकाचा डोक्यात दगड घालून खून
रायगड : रोहा तालुक्यातील धामणसई येथे डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून

या भागात मैदानावर अंधारात रात्री युवक दारू पीत बसतात, महिलांची छेडछाड होते. त्यातून अनेकदा त्यांच्यात वाद होतात. यातून हा खुनाचा प्रकार घडला आहे अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

जुळे सोलापूर : कल्याण नगरमध्ये युवकाचा डोक्यात दगड घालून खून
Beed crime news: चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news