Jyoti Waghmare | माढ्याच्या विकासात शिवसेनेचेही योगदान : खा. ज्योती वाघमारे

आतापर्यंत आठ कोटींचा निधी, आता भरीव शैक्षणिक मदत करणार
Jyoti Waghmare | माढ्याच्या विकासात शिवसेनेचेही योगदान : खा. ज्योती वाघमारे
Published on
Updated on

माढा : माढा शहराच्या विकासासाठी आतापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढे माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे हायस्कूलच्या शैक्षणिक विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिली. माढा शिवसेना शहरप्रमुख देविदास खरात यांच्या पुढाकारातून हायस्कूलला सदिच्छा भेट देताना त्यांनी ही भूमिका व्यक्त केली.

आपलेही शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेतच झाले असल्याचे खासदार वाघमारे यांनी नमूद केले. ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक असून, त्यासाठी शाळांच्या विकासाला आवश्यक ते सहकार्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. माढा येथील सहकार महर्षी गणपतराव साठे हायस्कूलला शैक्षणिक विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीमुळे शहरातील विविध विकासकामे मार्गी लागण्यास मदत झाल्याचे खासदार वाघमारे यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून, योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असे सांगून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, विज्ञान आदी क्षेत्रांतही सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक धैर्यशील भांगे यांनी केले. मीनाक्षी काशीद यांनी खासदार ज्योती वाघमारे यांचा परिचय करून दिला. हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या हस्ते खासदार वाघमारे यांना स्वहस्तलिखित भेट देण्यात आली. सूत्रसंचालन किरण शेलार यांनी केले.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन साठे, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पंडितराव साळुंखे, नगरसेवक राजू गोटे, शहाजी साठे, दिनेश जगदाळे, किरण पवार, भाजपचे तालुका उपाध्यक्ष नागेश राऊत, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिकेत चवरे, शिवरंग गोटे, संतोष साठे, अभिजित साठे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news