Solapur crime: शाळेच्या मुख्य गेटचे कुलूप तोडल्याने मोहोळमध्ये खळबळ; विद्यमान नगरसेवकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल होणार?

नगरपरिषद इमारतीसाठी शाळेची जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न? मुख्याध्यापकांकडून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तयारी
Solapur crime
Solapur crime
Published on
Updated on

मोहोळ : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेवर नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचालींना आता गंभीर वळण मिळाले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कुलूप शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक रमेश बारसकर चेतन देशमूख अजय कुर्डे बंडू देशमूख कंत्राटी सफाई कामगार यांना पुढे करून कुलुप तोडून आत प्रवेश केला. या प्रकारामुळे शहरात परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सोनटक्के , गवळी यांना वरिष्ठांनी आदेश दिला की, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.

Solapur crime
Solapur Crime: देशी बनावटीचे १७ पिस्टल, ४७ जिवंत काडतुसे जप्त

मोहोळ शहराच्या शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेवर नगरपरिषदेची इमारत उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, या प्रस्तावाला नागरिक, माजी विद्यार्थी तसेच शाळेशी संबंधित घटकांकडून विरोध होत असतानाच शाळेच्या मुख्य गेटचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Solapur crime
Solapur crime: कुर्डूवाडी येथील अंधश्रद्धा व जादूटोणा प्रकरण: दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघे सहआरोपी; दोघांना अटक

शाळेच्या मालमत्तेत अनधिकृत प्रवेशाचा आरोप

शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या अधिकाराने तोडण्यात आले, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित व्यक्तीला शाळेच्या मालमत्तेत प्रवेश करण्याचा अधिकृत अधिकार होता का? कुलूप तोडण्यास कोणाची परवानगी होती? तसेच नगरपरिषद इमारतीसाठी शाळेची जागा वापरण्याचा अधिकृत निर्णय झाला आहे का, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

Solapur crime
Solapur Crime: दिवसाढवळ्या महिलेवर हल्ला करुन मंगळसूत्र पळवले

मुख्याध्यापकांकडून पोलिसांत धाव

या प्रकाराची गंभीर दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. शाळेच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडणे, शाळेच्या परिसरात अनधिकृत प्रवेश करणे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाळेची जागा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वापरण्याबाबतचा संपूर्ण प्रशासकीय निर्णय, जागेची मालकी, हस्तांतरणाची प्रक्रिया, शासकीय मंजुरी आणि संबंधित ठराव यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Solapur crime
Solapur crime: प्रा.रामदास झोळ यांच्या दत्तकला शिक्षण संस्थेत पोलिसांची सोमवारी रात्रीपासून चौकशी सुरू

कुलूप कोणी, कोणाच्या आदेशाने तोडले?

शाळेच्या गेटचे कुलूप तोडण्याचा अधिकार संबंधित नगरसेवकांना कोणी दिला, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. अधिकृत परवानगी नसताना कुलूप तोडण्यात आले असे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे मोहोळकरांचे लक्ष लागले आहे. शाळेच्या जागेचा प्रश्न आधीच संवेदनशील बनलेला असताना कुलूप तोडण्याच्या घटनेमुळे नगरपरिषद प्रशासन आणि शिक्षण विभागासमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिस तक्रारीनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Solapur crime
Solapur Crime | 'तू मला सोडून दे'; पत्नीच्या प्रेमसंबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन जीवन संपविले

शाळेची जागा वाचविण्यासाठी नागरिक आक्रमक

दरम्यान, शाळेच्या जागेचा वापर नगरपरिषद इमारतीसाठी करण्यास विरोध करणारे नागरिक आणि माजी विद्यार्थी आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. शाळेचा ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवावा आणि कोणत्याही दबावाखाली शाळेची जागा हस्तांतरित करू नये, अशी शहरातून नागरिकाची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news