Solapur Crime: देशी बनावटीचे १७ पिस्टल, ४७ जिवंत काडतुसे जप्त

सहा जणांना अटक; अकलूज ग्रामीण पोलिसांची कारवाई
Pistol Arrest
Pistol Arrest File Photo
Published on
Updated on

सोलापूर : देशी बनावटीचे १७ पिस्टल, ४७ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख ४७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. यातील दोघे संशयित फरार आहेत, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टेंभुर्णी रस्त्यावर देशी बनावटीचे कट्टे विक्रीसाठी तरुण येणार असल्याची माहिती अकलूज पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार श्रीराम पोरे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून विकास कैलास वजाळे याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील माहितीच्या आधारे अन्य ५ जणांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक उबाळे, सहा. पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहा. पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडेस पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी केली.

संशयितांना विविध ठिकाणांहून केली अटक

अकलूज पोलिसांनी विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. पारिते, ता. माढा), राहुल सतीश माने (वय ३४, रा. वसंतदादा हौसिंग सोसा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०, रा. कोरके वस्ती, करकंब, ता. पंढरपूर), विजय सदाशिव करणगी (वय ४५, रा. शिवपूर, ता. अथणी, जि. बेळगाव), अनिल पंचलाल मेहता (वय ३२, रा. रांजणगाव, ता. वरला, जि. वडवान, मध्य प्रदेश) आणि सुमीत नाना लवटे (वय १९, रा. भुईटे वस्ती, ता. सांगोला) यांना राज्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश आदी वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केली आहे. प्रदीप पाडुंरंग माने (रा. चिकमहूद, ता. सांगोला), शनी भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा) हे दोघे फरार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news