Mohol Crime | गोरक्षणाच्या कामाच्या रागातून तरुणाला मारहाण; सात जणांवर गुन्हा

मोहोळ-पंढरपूर रोडवरील घटना; दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला, मोटारसायकलचेही नुकसान
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Mohol Police Case

मोहोळ : गोरक्षणाचे काम करीत असल्याच्या रागातून एका तरुणाला अडवून दगड आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना मोहोळ-पंढरपूर रोडवरील एका चहाच्या टपरीजवळ रविवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमोल महादेव चौगुले (रा. कुरुल, ता. मोहोळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, चौगुले हे त्यांचा मित्र सूरज गवळी याच्यासोबत चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दानिश कुरेशी याने अन्य सहा जणांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर दानिश कुरेशी आणि सैफ कुरेशी यांनी मोटारसायकलवरून जात असलेल्या चौगुले यांना अडवून बाजूला ओढले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्यांना मारहाण केली.

Crime News
Pandharpur News : ऊस दरासाठी भीमानगरमध्ये शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

या मारहाणीत सैफ कुरेशी याने दगडाने, तर अन्य एका संशयिताने लोखंडी रॉडने चौगुले यांच्या डाव्या दंडावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच, ‘यापुढे तू गोरक्षणाचे काम कसे करतो, तुला सोडत नाही,’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीच्या वेळी मोटारसायकल पडल्याने तिचेही नुकसान झाले.

या प्रकरणी दानिश कुरेशी, महंमद कुरेशी, सैफ कुरेशी, अल्ताफ कुरेशी, आदम कुरेशी, रिजवान कुरेशी आणि तौफिक कुरेशी (सर्व रा. मोहोळ) यांच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news