Rohit Pawar| शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, शेतमजुरांना २५ हजारांची मदत द्या

आमदार रोहित पवार यांची सरकारकडे मागणी
Rohit Pawar
आमदार रोहित पवार
Published on: 
Updated on: 

हंजगी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले असताना सरकारने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

तडवळ (ता. अक्कलकोट) येथील कै. सिद्रामप्पा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले.

आमदार पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी चार दिवसांपासून महाराष्ट्रात फिरत आहे. या दौऱ्यामुळे सरकारला जाग आली असून, नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करू लागले आहेत. ही चांगली बाब असली तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत देणे अधिक महत्त्वाचे आहे. याप्रसंगी सिध्दाराम म्हेत्रे, शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील, महांतेश हत्तुरे, आनंद बुक्कानुरे आदींनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर पालघरचे आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना देशमुख, सिध्दाराम म्हेत्रे, प्रशांत बाबर, संजयकुमार पाटील, शिवानंद पाटील, रमेश पाटील, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिध्दे, महांतेश हत्तुरे, शिवराज म्हेत्रे, आनंद तानवडे, आनंद बुक्कानुरे, मल्लिनाथ पाटील, प्रकाश सुरवसे, शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.